Pages

Friday, October 11, 2019

दि बुक ऑफ फाईव्ह रिंग्स् चे लेखक मियामोतो मुसाशी


दि बुक ऑफ फाईव्ह रिंग्स्

हे पुस्तक 1643 मध्ये मियमोटो मुसाशी या जापानी लेखकाने लिहिले आहे हे . ते पुस्तक जापनीज भाषेत लिहिले आहे.

जपानमध्ये जुन्या काळी योध्ये स्वतःला  बुशी या संज्ञेणे ओळखत असत.  बुशी म्हणजे सशस्त्र योद्धा.  जुन्या काळी जपान मध्ये मोठमोठे जमीनदार किंवा राजे त्यांना आपल्या पदरी ठेवत. जमीनदार म्हणण्यापेक्षा छोट्या-छोट्या प्रांताची राजेच होते आणि या राजांचा सम्राट होता जपानचा सम्राट. छोटे-छोटे राजांच्या संपर्कात असल्याने ते श्रीमंत होते आणि शक्तिशाली देखील होते. 

मियामोतो मुसाशी हे तिसऱ्या (टेन्ट गव्हर्मेंट) तंबूतला सरकार ( जसे महाराष्ट्रात पेशवे होते ) या काळात सुरुवातीला होते . हा काळ सतराव्या शतकापासून ते 1850 पर्यंत होता. 

पहिले तंबूतले सरकार हे बाराव्या शतकात उदयाला आले आणि जवळपास दीडशे वर्षे राहिले.  हे सम्राटाच्या समांतर चालणारे छोट्या छोट्या मांडलिक राजांचे हे राज्य. जसे छत्रपती हयात असताना पेशव्याचे राज्य. या पहिल्या तंबूतील सरकारला त्यामुळे कामाकुरा काळ म्हणतात. हे तंबूतील सरकार कामाकुरा या क्योतो जवळील छोट्याशा शहरात होते. 

दुसरा तंबूतला काळ हा 1338 मध्ये उदयास आला. हा नवीन वर्गाचा प्रस्थापना होती. याची स्थापना क्‍योटो मध्ये झाली. या काळाला अशिकागा काळ म्हणतात. थोडक्यात अशीकागा या कुटुंबाने हे स्थापित केलेले.

1868 मध्ये मैजी या सम्राटांने सर्व जपानला एकत्र केले.  सम्राटाचे अस्तित्व फार जुने आहे.  परंतु वास्तवात सम्राट स्वतःहून प्रत्येक कोपर्‍यात राज्य करू शकले नव्हते, आता ते स्वरूप त्यांना मिळाले आहे. सम्राटाला टाळून शोगुन यांनी राज्य केले होते.  ह्या काळामध्ये छोटे-छोटे राज्य एकमेकांमध्ये खूप भांडत होते. नंतरच्या येणाऱ्या तोकुगावा काळामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या कडून हत्यार काढून घेतले आणि सर्व सामुराई वर्ग त्यांनी किल्ल्यांमध्ये विस्थापिला. या तोकुगावा काळाला आपण असे म्हणू शकतो की ज्या पद्धतीने इंग्रजांनी भारतातील निरनिराळे राज्यावर अधिपत्य स्थापित केलं, त्याच पद्धतीने तोकुगवा यांनी राज्य केले आणि समान पद्धती वापरल्या.  यांनी सैन्याची संख्या कमी केली आणि सरदाराकडील सैन्य काढून घेतले.  जेव्हा अश्या योद्ध्यांना मोकळे सोडण्यात येतं किंवा योध्याचे पगार काढून घेण्यात येते त्यावेळेला योध्ये निरनिराळ्या व्यवसायात स्वतःला गुंतवतात आणि अशा वेळेला वाईट अवस्था अशी होते की समाजामध्ये नवीन घटना आपल्याला पहायला भेटतात त्यामध्ये बरे आणि वाईट या दोन्ही घटनांचा समावेश असतो. 

अशाच काळामध्ये मीयामोतो मुसाशी हे एक मालक नसलेले योद्धे होते आणि त्यांनी निरनिराळ्या लोकांना किंवा योद्ध्यांना आव्हान करून बरेच वेळेला द्वन्द्व केले होते आणि ते सतत विजयी होत होते.  त्यांच्या जीवनावर “सामुराई” हा चित्रपट आधारित आहे.


No comments: