Pages

Monday, September 19, 2016

छतावरील सौर उर्जा निर्मिती ........

मी छतावरील सौर उर्जा निर्मितीसाठी सौर पॅनल किंवा सौर पटल कसे निवडू ?

हा प्रश्न बरेच लोक मला विचारताहेत....
 आता या प्रश्नांचे उत्तर देणे म्हणजे काही प्रश्न मला त्यांना परत विचारावे लागतात... जसे 
१ . तुम्हाला किती उर्जा निर्मिती करायची आहे? ( watts मधे ) आणि कशासाठी ?
२ . पॅनल बसविण्यासाठी लागणारी जागा आहे का ?
३.  पॅनल बसवीण्या बरोबर आणखी काही तयारी करावी लागते का?
4. पॅनल हे फ़िकस की जागा बदल करता येण्या सारखे हवेत का?
५. तुमचे बजेट किती आहे? आणि तुम्ही अंदाज पत्रक करू शकता का?

आपण प्रत्येकप्रश्नाचे उत्तर बघू...


१ . तुम्हाला किती उर्जा निर्मिती करायची आहे? ( watts मधे ) आणि कशासाठी ?

हा प्रश्न मला तुम्हाला विचाराव लागतो कारण तुम्ही बंगल्यात राहता तो बंगला किती मोठा आहे याचा अंदाज घेतल्याशिवाय तुम्हाला योग्य उत्तर देणे शक्य नाही.

तुमच्या बंगल्याच्या उर्जा गरजेपेक्षा जास्त उर्जा निर्माण करता येते खरी परंतु जर तुम्ही तुमचे तेव्हडे पैसें त्यात गुंतवणूक करणार असाल तर आणि महत्वाचे म्हणजे आपल्याकडे तेव्हडी जागा आहे का?

आपण वीज निर्माण करून ती बंगल्यातच वापरणार की वीज कंपनीला विकणार?

तुमच्या बंगल्या मध्ये तुम्ही किती उर्जेचा वापर करता?
तुमच्या   कंपनी बिलावर किती विजेचे बिल तुम्हाला आकारले जाते?

.

 

No comments: